वळणावर अखेरच्या ...,,.. (चार)

Started by Ashok_rokade24, January 24, 2017, 02:56:51 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वळणावर अखेरच्या ,
वळून मागे पहातांना ,
पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ॥

मोजमाप सुखदुःखाचे केले ,
पारडेसुखाचे रितेच राहिले ,
भोग हे भोगता भोगता ,
जीवन ही सरत आले ,
अक्षरे सारी पुसट दिसती ,
हिशोब आयुष्याचा मांडताना ॥

पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ॥

जीवास जीव ज्यांनी दिला ,
खेळ तो क्षणभराचा ठरला ,
नीयतीने असा डाव साधला ,
सवंगडी ही जीवाचा हिरावला ,
आठवानेही मन भरून येते ,
काळोखी दु:खाच्या धडपडतांना ॥

पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ॥

आयुष्य सुखाचे दुजा वाटले ,
दु:ख ऊरीचे ऊरी लपविले ,
तीर शब्दांचे  ह्रदयी साहीले ,
मन घायाळ न  कुणा दाविले ,
असुनी सारे कुणी माझे न झाले ,
एकांत नीत जानवे मिटल्या डोळ्यांना ॥

पूर आसवांचा वहातो ,
आठवणी आठवतांना ॥

                  अशोक मु. रोकडे.
                    मुंबई,