सुर्यास्त ........?

Started by Ashok_rokade24, January 24, 2017, 03:01:01 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वाळवंट सभोवताली,
नजर भिरभिरत आहे ,
काहीच न लागले हाती ,
तरीही मी शोधीत आहे ॥

सुख सार्‍यांचे पाहीले मी ,
विसरलो माझा मला मी ,
दु:ख त्यांचे माझ्या शीरी ,
काया जर्जर होतआहे ॥

सुखात नित रमती सारे ,
बेधुंद जीवन जगती सारे ,
चुका नित त्यांच्या होती ,
शाशीत मी नित होत आहे ॥

सुख समान सर्वा दिले ,
दु:ख मनीचे मनी राखीले ,
मने मना पासून दुरावली ,
वादळ कलहाचे अडवित आहे ॥

त्यांच्या साठी जीवन जगलो ,
अस्तित्व माझे विसरून गेलो ,
वाळवंटी मी ऊभा एकटा ,
वाट सुर्यास्ताची पहात आहे ॥

काहीच न लागले हाती ,
तरीही मी शोधीत आहे ॥
                  अशोक मु. रोकडे .
                   मुंबई.