*** फक्त तुझ्याच मिठीत ***

Started by धनराज होवाळ, January 24, 2017, 09:22:13 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


💑 *फक्त तुझ्याच मिठीत* 💑

प्रेमवाटेने जाता जाता,
तुझ्यावर जीव जडला..
तुझ्या त्या प्रेमामुळेच,
सखे हा *प्रेमवेडा* घडला..!!

तुझ्या गोड हास्यातच,
सखे माझं सुख लपलंय..
तुझ्या सोबतीचे क्षण,
मी काचेसारखे जपलंय..!!

सखे तुझं हसणं म्हणजेच,
गुलाबाला मोगऱ्याचा गंध आहे..
अन् तुझं असणं म्हणजेच,
ओल्या मातीचा सुगंध आहे..!!

सखे तुझं लाजणं म्हणजेच,
उन्हाळ्यातली बरसात आहे..
अन् तुझं रुसणं म्हणजेच,
मिरचीला पेरूची साथ आहे..!!

सखे तुझं रागावणं म्हणजेच,
जणू महामाया जगदंबा आहे..
अन् तुझं रडणं म्हणजेच,
माझ्या श्वासाचाच थांबा आहे..!!

सखे तु आहेस सोबतीला,
माझं जीवनच स्वर्ग आहे..
माझ्या साऱ्या स्वप्नांचा,
जणू भरला एक वर्ग आहे..!!

म्हणूनच साठवलंय तुला,
मी माझ्या हृदयाच्या पेटीत...
आयुष्यभर रहायचंय मला,
सखे फक्त तुझ्याच मिठीत...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏻
(धनराज होवाळ)
कुंडल, जि. सांगली
📲मो. ९९७०६७९९४९.
🙏🏻🌹❤👼🏻❤🌹🙏🏻