अजून खूप जगायचंय मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 24, 2017, 10:51:34 PM

Previous topic - Next topic
*अजून खूप जगायचंय मला*
तुझ्या प्रत्येक आठवणींना विसरायचंय मला
तुझ्या साठी तोडलेले प्रत्येक नाते पुन्हा जोडायचेत मला
*अजून खूप जगायचंय मला*
विरहात तुझ्या घेतलेले चुकीचे पाऊल
पुन्हा मागे घ्यायचेत मला
तुझ्या साठी खूप मित्रांना दुखवंल मी
त्यांना पुन्हा मित्र बनवायचंय मला
*अजून खूप जगायचंय मला*
या डोळ्यांनी खूप तुझ्यासाठी अश्रू वाहिलेत पुन्हा या डोळ्यांना सुखाचे अश्रू काय असतात दाखवायचंय मला
*अजून खूप जगायचंय मला*
खऱ्या प्रेमाच्या खोट्या शपता घेतल्या जातात इथं हे या जगाला दाखवायचंय मला
*अजून खूप जगायचंय मला*
तुझ्या साठी प्रेम कविता खूप लिहल्या मी
विरह कविता काय असतात हे दखवायचंय तूला
*अजून खूप जगायचंय मला*
तुझ्या आठवणींत जगत आलोय
तुझ्या आठवणीनं शिवाय जगणं शिकायचंय मला
*अजून खूप जगायचंय मला*
तुझ्या साठी मरून काय भेटणार मला
घरच्यांन साठी जगून पहायचंय मला
*अजून खूप जगायचंय मला*

..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर