माझा मी...

Started by गणेश म. तायडे, January 25, 2017, 01:38:25 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

एकट्यात बसून एकदा
सहज विचार आला
सुखात होते सारे
सगळ्यांना आनंद झाला
दुःखात नव्हतं कोणीच
जो तो माघारी गेला
जीव लावला साऱ्यांवर
कामी कुणीच ना आला
होते नव्हते सारे काही
गरजा साऱ्यांच्या भागवल्या
रस्ते शोधणाऱ्यांना
वाटा मी दाखवल्या
आता आहे मी एकटा
पण सोबत कुणी नाही
समजले आज सारे
कुणी कुणाचाच नाही
जो तो सहप्रवासी
वाट आपली शोधणारे
मी उरलो एकटा
लोक दिसतात धावणारे

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11