तू...

Started by Nitsal25, January 25, 2017, 03:14:22 PM

Previous topic - Next topic

Nitsal25

आठवणींच्या पुस्तकातील तू एक पान
ते वाचूनी सतत वाटे मज खूप छान,

रात्रीच्या या आकाशातील तू एक तारा
एकदा तू हसुनी दे बघ उजळेल जग सारा,

फुला मधल्या मकरंदा सम तू एक गंध
जोडशील का मज सवे हे रेशमी बंध,

तु हसावी, तु बोलावी सर्व माझ्या पाशी,
वेड लावी त्या आठवणी माझ्या या जीवाशी,

तू नसताना बेकार वाटे हे जग सारे
एकदा तू बोल ग तूच माझा सखा रे,

साथ देशील हर जन्मी हिच आशा बाळगतो
याच आठवणीत सर्व वेळ मी घालवतो...|

write by myself... (नितेश साळुंके) 9773498654