जातानाही मग त्या वळनावर थांबलीस का????

Started by किरण फापाळे, January 26, 2017, 05:55:45 AM

Previous topic - Next topic

किरण फापाळे

जायचच होते निघून तर जाताना वळलीस का?
जातानाही मग त्या वळनावर थांबलीस का?
कधीच बोलली नाहीस तू
मी ही नाही बोललो
त्या मूक भावनेत शब्द आडवे नाही आले
अचानक असं नको ते बोललीस का..
तुझ आसपास असणेही मला मोहरून टाकायचं
हे फ़क्त मलाच नाही तुलाही समजायचे
इतके समजून ही तु अचानक गेलीस का?
जातानाही मग त्या वळनावर
थांबलीस का?
तु जाताना ही माझी आस असेल
आणि तुझे वळणावर थांबणे हा फ़क्त भास असेल..
जातानाही मग त्या वळनावर थांबलीस का?
                     किरण फापाळे ( नगरकर )
                     ९८६९५२८१२३...