देशभक्ती... (प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा)

Started by गणेश म. तायडे, January 26, 2017, 08:50:09 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

देश आठवतो जेव्हा
२६ जानेवारी येते तेव्हा
उसळते देशभक्ती
येतो भावनांना पूर तेव्हा
आठवतात बलिदान
होतो जयघोष तेव्हा
घेऊनि झेंडे हाती
भरतात मेळावे तेव्हा

का नसते मग सुध
देशविरोधी बोलताना
का नसते मग जाग
सत्तेसाठी भांडणाऱ्यांना
का नसतो मग होश
इथल्या युवा नागरिकांना
का नको होतो मग देश
आपल्याच देशवासियांना

विचार करण्याची वेळ
आज आहे बांधवांनो
देश घडवण्याची संधी
आज आहे मित्रांनो
घराप्रमाणे देश हि
आपलाच नागरीकांनो
देशभक्ती सदा उरी ठेवुनी
ईमान राखा युवकांनो

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11