घरटं

Started by Dnyaneshwar Musale, January 26, 2017, 06:30:10 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

करवंदीच्या ताटीवरती
लहानगे तुझे घर
दाणा टिपताना तुझा मंजुळ
गाण्याचा गं सुर.

घनदाट काळोखात
रान काढीतं एकटच रात
तुझ्या चिवचिवाटाने
जन्मती इंद्रधनु सात.

झाडीत इथं तिथं नांदण्यास
सारं तुझं रानं
प्रहार दिड प्रहाराला
उसवतं एकटचं माळरान.

आता झाडावरती बसुन
तु रानावरती ठेवते डोळा तिरपा
इकडे तिकडे दिसतात तुला घरे
जणु राणावर पडला आहे करपा.

तरी नजरेत तुझ्या नसे
कसलीच भीती
तुला पाहुन मग बिघडते
शिकाऱ्याची नीती

तु धावपळ करीत जाते
शिकाऱ्याला चुकून
पण पशु पक्षांनाही  घर असतं
हे माणसा तु घे रे शिकुन.