तिरंगा (देशभक्ती भाग २)

Started by गणेश म. तायडे, January 27, 2017, 09:35:50 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

ओसरली देशभक्ती
तिरंगे चहूकडे विखुरलेले
जे मिरवत होते हाती
आज पायदळी तुडवलेले

नको अशी देशभक्ती
तारखेला उसळणारी
नको असे राष्ट्रप्रेम
लगेच सारे विसरणारी

हवा ध्यास मणी सदा
देशहिताच्या कार्याचा
नको नुसता गोंधळ
एक दिवसाच्या जोमाचा

जगावे करावे मरावे
देश प्रगतीस न्यावे
तन मन धन सारे
देशहितास अर्पावे

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11