ती

Started by kuldeep p, January 27, 2017, 06:21:03 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

अमुलचा तो आईस्क्रीम पार्लर
पार्लर मधली ती
अनोळखी अपरिचीत व्यक्तिसोबत
घाबरलेली ती
जवळ असताना चोरून बघणारी
लाजलेली ती
देखणी सुंदर मनाला भुरळ पाडणारी
भुवयामधील टिकली ती
रेशमी केसांची चेहर्यावर उडणारी
हलकीशी बट ती
काळेभोर निरागस डोळे डोळ्यातील भाव
हरवून जावीशी वाटणारी ती
बाईकच्या मागच्या सीटवर बसणारी
अलगद खांद्यावर हात ठेवणारी ती
माझी नव्हती कधी पण
माझी वाटणारी ती
लिहीणार नव्हतो कधी पण
तिच्यासाठी लिहीली कविता ही........

©कुलदीप