कुणाची नजर नको...

Started by गणेश म. तायडे, January 27, 2017, 08:27:02 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

तुझ्या माझ्या प्रेमाला
कुणाची नजर नको
येता जाता इशाऱ्याने
मला बोलवू नको
हात तुझा धरला तर
उगाच सोडू नको...
मला तुझ्या पासून
कधी दूर करू नको
मी सदा तुझा आहे
तू मला सोडू नको...
जीव जडला तुझ्यावर
मला त्रास देऊ नको
खोडी तुझी काढेल
मला रागावू नको...
बोल माझ्यासोबत
पण गप्प राहू नको
मनाच्या कानोड्यात
कुणाला जागा देऊ नको
तुझ्या माझ्या प्रेमाला
कुणाची नजर नको...

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11