सारं संपलंय...

Started by गणेश म. तायडे, January 28, 2017, 10:51:18 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

तुला जस हवं होतं
तसंच सारं घडलंय
तुला जे नको होतं
ते आता सारं संपलंय

बोलणे कधीचे बंद झाले
नुसता विरह आता आहे
तुझ्या माझ्यातील प्रेम
केव्हाच लुप्त झाले आहे

नातं तुला नको होतं
ते हि आता तुटत आहे
हातातील हात माझ्या
अलगदपणे सुटत आहे

मनाची कवाडे कधीची
बंद झालेली आहेत
विचार डोक्यातील
आता शांत झाले आहेत

पाऊला पाऊली तुझ्या
खुणा दडलेल्या आहेत
आता मात्र त्या हि थोड्या
पुसट झालेल्या आहेत

तुझ्या माझ्यातील आता
मजा मस्ती संपून गेली
उरलेली आठवण तीही
आसवांत वाहून गेली

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11