आठवण

Started by @गोविंदराज@, January 28, 2017, 12:31:39 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

खूप खोलवर मनात काहीतरी दडलेलं असत..
त्यावर फक्त काळाच पांघरुण पडलेलं असत..

आठवणी तशा अगदीच विसरताही येत नाहीत...
त्रासाविना मनात साठवताही येत नाहीत...

फक्त माझी म्हणणारी मानस हि दूर निघून जातात..
कुणी कुणाचं नसत जणू असच सांगून जातात..

तुझा विना जगूच शकत नाही असे कधी काळचे शब्द..
आणि आज प्रत्येकाच्या आयुषयाचा एक वेगळाच प्रारब्ध..

मी आता विसरलोय सगळं असं म्हणता येत...
पण खरंच का सगळं असच सहज विसरता येत...
--------    गोविंदराज
२८.०१.२०१७