कुठेरी वळायचं राहिलंय...

Started by @गोविंदराज@, January 28, 2017, 01:09:16 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

जीवन कशाला म्हणायचं अजून कळायचं राहिलंय...
चालतोय एवढं खरं पण कुठेतरी वळायचं राहिलंय...

हे हवं..ते नको इच्छा काही पुरत नाहीत...
दिवस निघून जातात,, क्षण काही उरतं नाहीत..
त्या क्षणांना हि काहीतरी कळायचं राहिलंय...
चालतोय एवढं खरं पण कुठेरी वळायचं राहिलंय...

आपलं काय आणि परकं काय कसं ठरवाव..
माझ्यातल्या "मी" ला मीच कसं हरवावं...
त्या मी च गुपित अजून कळायचं राहिलंय...
चालतोय एवढं खरं पण कुठेरी वळायचं राहिलंय...

शोध घेतोय अस्तित्वाचा जिवाच्या आतंकाने...
हरवलंय काय मी  कोण जाणे कशाने...
कि मलाच माझ्यापासून पळायचं राहिलंय..
चालतोय एवढं खरं पण कुठेरी वळायचं राहिलंय...

किती परिसीमा त्या नवख्या धुंडाळल्या मी...
आठवणी कशा कशा आतड्यात गुंडाळल्या मी...
तरी अजून काय काय ढवळायचं राहिलंय...
चालतोय एवढं खरं पण कुठेरी वळायचं राहिलंय...

जीर्ण झाली जोडलेली नाळ त्या बुंध्याशी...
नात्याची सलगी कसली मग त्या फांद्यासी...
सुकलेलं पण फक्त गळायचं राहिलंय...
चालतोय एवढं खरं पण कुठेरी वळायचं राहिलंय...

शोधलंय गुप्तपणे मीच जणू मरण माझं...
रचलंय मीच माझा हाताने सरण माझं...
आता ते फक्त जळायचं राहिलंय...
चालतोय एवढं खरं पण कुठेरी वळायचं राहिलंय...

-  -  - @ गोविंदराज @
            २८/०१/२०१७