दमलेला बाप...

Started by गणेश म. तायडे, January 28, 2017, 06:37:19 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

गोष्ट सांगतो मी तुम्हा
माझ्या चिमणी ची
नीट ऐका हो तुम्ही
हाक काळजाची
जेव्हा मी दूर कुठे
कामाला जातो
न बोलता घरून
निघून जातो
सकाळी सकाळी
ती उठल्यावर
बाप शोधता होई
जीव खाली वर
असा कसा बाप
न बोलता गेला
चिमणी ला एकटं
सोडून गेला
नजरेमध्ये बाप होता
डोळ्यांमध्ये पाणी
गोंडस चेहऱ्यावर
रागाची आणिबाणी
बाप हरवून गेला
जीव झाला कासावीस
शोधता शोधता
गेला निघून दिवस
दमलेला थकलेला
बाप घरी आला
चिमणीला जवळ
घेऊन म्हणाला
जाऊ उद्या कुठं
तरी दूर फिराया
स्वप्नातल्या परींना
इथे तिथे शोधाया
पक्षांसोबत उंच
उंच उडाया
सकाळ झाली जेव्हा
बाप होता हरवलेला
सैरभैर चिमणी
बाप होता दमलेला
कामाला जाताना
घरून रडत जाणारा
येतांना सोबत तिला
खाऊ आणणारा
बाप लेकीची हि गोष्ट
आहे भली न्यारी
अंगावर काटा अन्
डोळ्यांतुन वाहणारी

- गणेश म. तायडे, खामगांव
http://www.facebook.com/kavitasangrah11