लाईफची पानं

Started by rhtbapat, January 29, 2017, 11:58:02 AM

Previous topic - Next topic

rhtbapat

स्वप्नांच्या दाराला का अंधाराचे टाळे
चकव्या फसव्यांचे साले नशिबाचे चाळे  :-\
जिंकणाऱ्यांचा रस्ता सोपा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?  >:(

फुललेल्या झाडांवर माकडांच्या रांगा  :D
आपलाच घोडा आणि आपलाच टांगा
फाटक्यांचा रोमियो हा करतो तरी कोण ?  8)
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?  :D

व्हाईट कॉलर म्हणून कधी बंड नाही केला
तरी लोक म्हणतात कसा पोरगा वाया गेला  ::)
दिव्याखाली बसून मोठा होतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?  :D

नेता असतो कोणी आणि कोणी हिटलर
कोणी होतो पोलीस आणि कोणी प्रोफेसर
यांच्या जाळ्यात साला फेकतो तरी कोण ?  :angel:
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?  :D

- रोहित विजय बापट

YouTube Link: https://www.youtube.com/watch?v=PdlZMQ-tjs0

Ajay sanjayrao yawale