मी मनाच्या कोप-यात !!

Started by श्री. प्रकाश साळवी, January 29, 2017, 01:57:48 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

मी मनाच्या कोपऱ्यात !!
-------------------
मी मनाच्या कोप-यात काहीतरी शोधीत होतो
मिच माझे कोडे उलगडीत होतो
शोधित होतो त्या क्षणांना श्वासात माझ्या
अंतरीचे गुज मी ऊकलीत होतो
नाही जगाचा या भरोसा समजून घे
मी ऊद्याचे गणित मांडीत होतो
पाहिले तुला मी गालात हासताना
हासण्याचे संकेत मी जुळवित होतो
मागितले थोडे तारे या नभांगणाचे
का स्वतःला ऊगाच मी फसवित होतो!
घेऊन ये गाणे जगायचे कसे ते
गाण्यात "प्रिती" ला मी सजवित होतो
जगण्यात जिवनाच्या नशा फार झाली
एकेक प्याला नशेचा मी रीचवित होतो
ऊधळीत जा फुलांच्या पाकळ्या तू
मी गझ़लेला मात्र फुलवित होतो
**
प्रकाश साळवी
२५/०१/२०१७