सागर किनारा

Started by swaraj, January 30, 2017, 06:03:52 PM

Previous topic - Next topic

swaraj

                                                     सागर किनारा
तो सागर किनारा
आणि मंद मंद वारा
हवा हवासा वाटे
तुझा सहारा

हात तुझा माझ्या हाती
माझा हात तुझ्या हाती
नजरेला नजर भिडे
सागरावरती लहर उठे
तो सागर किनारा.......

जशी लहर उठे
हृदयाचे वाढे ठोके
मनामध्ये तरंग उठे
जणू प्रेमाची लाट उसळे
तो सागर किनारा .........

तुझी माझी प्रीत जुळे
जशी किनाऱ्याला लाट मिळे
आणि मिळे क्षितिज धरतीला
तो सागर किनारा ........
Swati Gaidhani (swaraj )

Devendra.gaidhani