आयुष्य.....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 31, 2017, 11:51:09 AM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

Whatsapp वर आपल वेगळच जग बसल होत,
तुझी आठवण येताच Whatsapp सुरू करायचो.
त्याच क्षणी तू online यायचीस
तुला Message पाठवताच ती एक फुल्ली
दोन व्हायची आणि लगेच निळ्याही व्हायची
Online ची जागा लगेच Typing घ्यायचे,
बघताच क्षणी तुझा Message यायचा.
किती सुंदर दिवस होते ते,
दिवस – रात्र आपण बोलत बसायचो.
पण आता बदललय सगळ.
तुझी आठवण येताच मी Online येतो
पण तू दिसत नाहीस.
तुझे Status आणि Picture बघायला डोळे समर्थ नाही.
जिथे Typing लिहून यायचं ती जागा
माझ्या आयुष्या सारखी ओसाड पडली.
आता तुला Message पाठवता ,
ती फुल्ली ना दोन होते ना निळी.
कदाचित नशिबाच्या Sim Card ने
Signel घ्यायचं सोडले.
किंवा आयुष्याचा Mobile खराब झाला .
काहीच कळत नाही..

  बुद्धभूषण गंगावणे.
  7738628059