सुटले सारे...

Started by गणेश म. तायडे, January 31, 2017, 04:06:53 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सोडून गेले सारे नाते
मला सोडूनि अंधारात
नको होते ते घडले
मला जाळून दिसरात

भय लागे प्रकाशाचाही
चटके देई सावली आज
जीव गुदमरून कोंडला
माझीच मला वाटे लाज

आसवे माझ्या डोळ्यांची
ना थांबे थांबवता धार
वाटे मिटावे सदा पापण्या
दिसे भविष्य काळेशार

दुरावल्या चोहीदिशा
उरला नुसता हाहाकार
हरवले सारी माणसे
दिसे मला फक्त आकार

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11