माझ्या त्या शेवटच्या क्षणी तरी येशील का

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 31, 2017, 05:21:14 PM

Previous topic - Next topic
माझ्या त्या शेवट च्या क्षणी  तरी येशील  का
माझ्या साठी थोडे तरी डोळ्यात तुझ्या अश्रू आनशील का
माझ्या अंत्ययात्रेत तरी सहभागी होशील का
एकच शेवटची इच्छा आहे ती तरी पूर्ण करशील का
तिरडी वरती ठेवताना एकतरी हाक मला देशील का
जाता जाता माझ्या सरणावर प्रेमानं फुलं वाहशील का
एकदा स्मशानात गेल्यावर तरी आठवण माझी ठेवशील का

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर