फोटो

Started by dwait, February 02, 2017, 04:18:57 PM

Previous topic - Next topic

dwait

तस कविता, चारोळ्या करन मला फार काही जमत नाही
पण तुझा तो हसरा चेहरा पाहुन वाटत काही लिहावस
अर्थात जाणीव असते मला एवढी प्रतिभा ह्या पामरापाशी नाही
तरीही प्रयत्न करत रहातो तुझा तो फोटो पुन्हा पुन्हा पहातो
एखाद रुपक, एखादी उपमा
नजरेसमोर सतत तुझीच प्रतिमा
शब्दांची जुळवाजुळव तरीसुधा जमत नाही
पण फोटो पाहील्याशिवाय तुझा मला मुळीच करमत नाही
ना या शब्दाना गती ना काव्याला दिशा
तरीही कवी बनन्याची हि एक वेगळीच नशा
सुचते कधी काही तुझ्या डोळ्यांकडे पाहून
पण हरवून जातो त्यात जाते लिहायचे राहून
माझी ही धडपड बघुन कधी फोटो मधून हसतेस
अन सोडून दिला हा छंद तर उगाच खोट रुसतेस
कविता लिहिण्यासाठी तुला पहावे की
तुला पाहण्यासाठी म्हणून कविता लिहावी
हयाचा खुलासा करण्याची ख़रच तुला गरज आहे ?
अन नसेल कळला अर्थ ह्याचा तर माझे कवी बणने व्यर्थ आहे...  माझे कवी बणने व्यर्थ आहे

                                                                           .... गुरुनाथ