रहस्य...

Started by masterkr, February 03, 2017, 02:02:14 PM

Previous topic - Next topic

masterkr

रहस्य...

   जिवनाच्या वाटेवरती मी स्वतःस विसरत सुटलो
     जगण्याचे रंग ना कळले बेरंग होऊनी मिटलो

  पाण्यासवे वाहत होती माणुसकी खोल तळाला
  जिवनाचा काचचं फुटला काचेचा अर्थ न कळला

   सरीतांचे पाणी सरले जखमांचे पाणीच प्यालो
    दुःखातचं जीवन कळते सुखातचं विसरुनी गेलो

   सत्याची सोबत सुटली मिथ्यातचं रमणीय झालो
    इवल्याशा दमडीसाठी लाज विकूनी आलो

    सरणाची साथ ही सुटली नशिबाचे धागे तुटले
     जीवनाचे रहस्य कळता आगीतून अश्रू फुटले

       ---   केदार जोशी
              जळगांव जामोद
       (9130838443)