जीवास भिडावे

Started by Parshuram Sondge, February 05, 2017, 07:01:36 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

देहास माझ्या  स्पर्शताना
तू जरा काळजाला भिडावे

श्वासात श्वास गुंतताना रे
उरातले चांदणे धन्य व्हावे

बहर माझा नि कहर तुझा
क्षणांनी जराशी धुंद व्हावे.

तू बेभान मी व्याकूळ तरी
देहानी जरा किनारा व्हावे.

पाकळया तू  उलगडताना
तुझा गंध जरा  कुंद व्हावा.

तू रिक्त कधी,  विरक्त कधी
मलाही सृजनाचा पूर यावा

. . .  . .सोंडगे परशुराम, पाटोदा
          9673400928
Pprshu1312