आज हे अश्रू आपल्या प्रेमासाठी

Started by Vishakha Sonawane, February 07, 2017, 01:25:25 PM

Previous topic - Next topic

Vishakha Sonawane

आज हे अश्रू आपल्या प्रेमासाठी  ,
तुझ्या आठवणींना आठवत हसून दुःख लपविण्यासाठी

आज हे अश्रू तुझ्या सहवासासाठी  ,
आणि तुझ्या दुराव्या नंतर खूप काही सोसलेल्या मनासाठी ,

आज हे अश्रू आपल्या नात्यासाठी ,
एकटेपणात तू दिलेल्या आधारासाठी आणि वेळेसाठी ,

आज हे अश्रू मला सांभाळून घेण्यासाठी ,
आणि आधार देऊन शेवटी एकटेपणाची जाणीव करून देण्यासाठी

आज हे अश्रू माझ्या न सुटलेल्या प्रयतेक  कोड्यासाठी ,
शेवटी सारे अश्रू ओघळले मनाची वेस आणि पापण्यांच्या उंबरा ओलांडून ,......



विशाखा सोनावणे .......