मैत्री

Started by Praj...., February 07, 2017, 02:49:08 PM

Previous topic - Next topic

Praj....

तुझ्या कालच्या प्रश्नाचे काय उत्तर देऊ
मला काहीच समजत नाही
तुला असा प्रश्न कसा पडला
हे देखील कळत नाही

तुझ्या माझ्या मैत्रीच्या
नात्याच कसा उलगडा करू
तू किती महत्वाची व्यक्ती आहेस
हे कोणा-कोणाला आणि किती वेळा सांगू

तू करतेस माझी काळजी त्याला
कृतघन मला वागता येत नाही
या साऱ्याला माझा स्वभाव कारणीभूत
पण त्यावर औषध मिळेना काही

माझी मैत्री इतकी कमकुवत निघाली का
कि तू माझ्या 1-2 चुकांना कंटाळलीस
असले विचार मनात आणून तू माझ्या
मैत्री वर शंका निम्रान केलीस


Praj😘