अजून किती दिवस जगावं लागेल

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 08, 2017, 01:37:28 AM

Previous topic - Next topic
तुझ्या आठवणींना घेऊन
अजून किती दिवस जगावं लागेल
एकनएक दिवस तुला न घेऊन
जाताच इथं मरावं लागेल
प्रेम माझं कुठं कमी पडलं
हे मला पुन्हा आठवावं लागेल
माझं प्रेम कुठं कमी पडलं
शेवटी तुलाच दाखवावं लागेल
दुःखाच्या या झुल्या वर
अजून किती दिवस झुलावं लागेल
अजून किती दिवस तुझ्या साठी
इथं झुरावं लागेल
अडचणीत असता तू शेवटी
मलाच धावावं लागेल
शेवटी प्रेम करतो ना तुझ्यावर
तू बोलवशील तिथं मला यावं लागेल
तुझे दुःख अश्रू मलाच पुसावे लागेल
तरी देखील तुला न घेऊन जाताच
मला शेवटी मरावं लागेल

✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर