ये गं, ये गं कविता

Started by गणेश म. तायडे, February 08, 2017, 07:26:39 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

ये गं, ये गं कविता
तुला शाईत भिजवतो
अक्षरांमध्ये तुला आज
पहा कसा मी गुंतवतो

शाई मध्ये भिजून तू हि
न्हाऊन घे अलंकाराने
कडव्यांच्या जोडीने
तुला मांडतो मी प्रेमाने

नको रुसू तू कधी राणी
मला वेड तुझे लागलेले
तुज व्याकरणी सजवताना
मला पाहू नको रागाने

यमक तुझे जुडवताना
माझा संधी विग्रह होतो
ओळ ओळ विणताना
तुला त्रास कसला होतो

सुख दुःखाचे मी रंग
तुझ्या ओव्यांमध्ये मांडतो
कधी खूप हसवते तर
कधी आसवांचा सडा सांडतो

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11