अंधश्रद्धा

Started by गणेश म. तायडे, February 08, 2017, 03:26:29 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

बोकड मला हवं कोंबड मला हवं
देवाच्या नावाच खाण मला हवं
देव आले अंगात ती झाली झिंगाट
केस मोकळे सोडून खेळू लागली पिंगाट
देव कुठं आहे कुणालाच माहित नाही
दगडामध्ये देव कोणालाच मिळत नाही
निंबु मिरच्यांची झाली अद्भुत जादू
आजार बरे करू लागले इथे काही भोंदू
आजार बरा होईना लोक मरा लागले
अंधश्रद्धा पाळून लोक जगा लागले
भूतबाधा झाली म्हणे निंबू टाका ओवाळून
नाहीच जमलं तर टाका चिंता जाळून
भोंदू बाबा आता चांगले साहेब झाले
जीवांच्या धंद्याचे ते सौदागर झाले

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11