संसार

Started by sulabhasabnis@gmail.com, February 08, 2017, 08:08:51 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

       संसार
पाहिले होते स्वप्न  फुललेल्या  गुलाबाचे
हाती मात्र लागत राहिले ओरखाडेच काट्यांचे
वाटले वृक्षाच्या आधाराने वेल कशी बहरेल
त्यालाच आधार देतादेता खुरटून गेली वेल
धागाधागा गुंफतच राहिले गोफ विणण्यासाठी
उसवत गेला पीळ , धागे नुसते उरले हाती
सुराला सूर जुळवत राहिले गीत गाण्यासाठी
बेसूर अधुरेच गीत आता उरले माझ्या गाठी
अधुरे गीतच  अजून  बसलेय पुरे  करीत[/font]
हीच तर आहे ना गं सईबाई संसाराची रीत ?[/font]
             -------------[/font]