आंधळं प्रेम...

Started by गणेश म. तायडे, February 08, 2017, 08:08:51 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

प्रेम आंधळ असते
डोळे उघडे असूनही
मने जुळत असतात
अंतरी दुरावा असूनही
मी आज तिचा आहे
ती माझी नसूनही
लादले होते प्रेम मी
तरी गुंतली कळूनही
गुरफटत होती ती
प्रेम नव्हते कधीही
जेव्हा तिला प्रेम झाले
मी नव्हतो असूनही
सारं होत जबरदस्तीचं
सहज नव्हतं काहीही
सुटत नव्हती प्रेमाची गाठ
तिने सारे मला सांगूनही
तरी बोलत होतो आम्ही
पूर्वीचा गोडवा नसूनही
प्रेम तिला कळत नव्हते
मला सारे काही वळूनही
सहज नव्हते विसरणे सारे
हृदयी त्रास होता तिच्याही
नव्हतो सुटत मी तिच्यातून
तडफड पहावत नव्हती मलाही
वाटले जावे सोडूनि सारे
न करता तिचा विचारही
जगू द्यावे तिला तिचे
होउ दे त्रास तिला कितीही
भरभरून दिले प्रेम मी तिला
आठवणींनी भरलेली मने ही
जाईल दूर तिच्या असा आता
ना दिसेल तिला जवळ असूनही

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11