तिच्यासाठी लिहताना...

Started by गणेश म. तायडे, February 09, 2017, 03:20:18 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

दुःख लपवले मी तिचे
तिला शब्दांत कोरताना
पाहिले आहे मी तिला
माझ्यासाठी रडताना

कुरवाळून गेले शब्द तिला
शांत झोपून ती असताना
मांडत गेलो भाव तिचे
तिच्याचसाठी झुरताना

एकरुप झाले होते सारे
तिच्यात जीव रंगताना
होई माझे फुलपाखरू
पाहुनी तिला हसताना

स्वच्छंद गिरक्या घेई मन
भाव सदा तिचे भासताना
लिहत गेलो तिचे मन मी
जरी त्यात मी नसताना

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11