विश्वास

Started by Vishakha Sonawane, February 09, 2017, 03:57:33 PM

Previous topic - Next topic

Vishakha Sonawane

विश्वास...

दोन वेगळ्या वाटेची माणस कधी एकत्र येतात
हे मान्यच नव्हतं मला.
पण तुझ्या-माझ्या नात्याने त्याचा विश्वास करून दिला मला.

आयुष्यात कुटुंबाव्यतिरिक्त काहीच मौल्यवान नव्हतं मला
पण आता तुझ्याशिवाय जीवनात काहीच महत्वाचे नाही मला.

दुःखाची ओंजळ भरून गेलेली असताना,
तुझे ते प्रेमळ शब्द 'मी सोबत आहे' असा दिलासा देतात.

कित्येक दिवस तो एकटा जीवनप्रवास करत होते
पण तुझ्या त्या एका भेटीने मला तुझ्यात सामावून घेतले.

सततचा हा विचारांचा अफाट समुद्र मला स्वतःत ओढुन नेतो
पण तुझा तो भावनिक स्पर्श मला जणु घट्ट मिठीत घेऊन बसतो.

जीवनाच्या वाटेवरून चालताना खुप काही हातून निसटून गेल
पण हातात तुझा हात आहे याचा आधार देऊन गेल.

आयुष्यात खुप काही गमवल आहे रे आतापर्यन्त
पण तुला गमवण्याचा धक्का नाही पचवू शकत मी मरेपर्यंत .

राज्या अस काही करु नकोस की माझा नात्यांवरचा विश्वास उड़ेल
अन् घरटयात कोलमडलेल हे पिल्लू तिथेच शेवटचा श्वास सोडेल.

                                                                                     विशाखा सोनावणे..