दिवस आज सोनियाचा....

Started by कदम, February 09, 2017, 11:37:44 PM

Previous topic - Next topic

कदम


दिवस आज सोनियाचा
लोकशाहीतील मॅजिक मॅनियाचा
राष्ट्रवादाचा,समाजवादाचा
तुमचा माझा समानतेचा
मतदान करून बनवू

भविष्य आपले आपणंच घडवू
भारतभूमीचा शिरी माणिकमोती जडवू
हक्क आपला संघटनेचा
हक्क आपला एकात्मतेचा
मतदान करून मिळवू

माणासातील माणुसकीचा,
विश्वासाचा,प्रगतिच्या प्रतिकाचा,
अबाल वृध्दांच्या जागृतीचा,
मार्ग आपला कर्तुत्वाचा,
मतदान करून बनवू

दिवस आज सोनियाचा
कर्तव्यशील नेतृत्व उभारण्याचा
आपला माणूस निवडण्याचा
विकासप्रिय लोकनेता घडवण्याचा
मतदान करून घडवू

लोकशाही जगवण्यासाठी
सत्तेवर येण्यासाठी
समाजाच्या उन्नतीसाठी
बंधुत्वाच्या न्यायासाठी
मत मतदानाच्या हक्कासाठी

चला चला विचार एकमत करून
हात हातात एकमेकांचा धरून
नेतृत्वासाठी जनमत एक करून
येवू निशाना निशानी साधून
कुशल नेतृत्वाची निवड करून

     दिवस आज सोनियाचा
लोकशाहीतील मॅजिक मॅनियाचा...!