propose day special

Started by vikas0316, February 10, 2017, 11:33:57 AM

Previous topic - Next topic

vikas0316

तूच माझे प्रेम प्रिये तूच माझी प्रित
माझ्या प्रेम परीक्षेत होणार का माझी जीत...

अर्ज करतो आज तुला गाऊन प्रेमाचे गीत
माझ्या या प्रेम परीक्षेत होणार का माझी जीत...

प्रेमभाषेत propose day म्हणतात ह्या दिवसाला हि नवीनच प्रेमअर्जाची रीत......
माझ्या या प्रेमपरिक्षेत साजने होणार का माझी जीत....

आयुष्यभर मी आरक्षित ठेवली ह्र्दयात तुझी सीट.....
माझ्या या प्रेमपरिक्षेत होणार का माझी जीत.....

तूच अप्सरा माझ्यासाठी,तूच माझ्या जीवनाचे मधुर गीत....
प्रेमपरिक्षेत होणार का साजने खरंच माझी जीत.....

तुझ्या अबोल स्वभावाला भितो फक्त अतिरिक्त नाही कुणाला भीत.....
सांग प्रिये मला नक्की
माझ्या या प्रेमपरिक्षेत होणार का साजने खरंच माझी जीत.....

मला ही दे तुझ्या ह्र्दयात कोपर्याची सीट....
आजचा हा दिवस प्रेमाचा कित्येक प्रेमी होतील एकत्रित....
माझ्या या प्रेमपरिक्षेत होणार का साजने खरंच माझी जीत.....

लवकर सांग प्रिये तुझ्या या प्रेम वेड्याची होणार का ग जीत........

                                   -विकास राजेंद्र पाटील