मी...

Started by गणेश म. तायडे, February 10, 2017, 04:33:31 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

मी यात, मी त्यात
मी आहे चराचरात
नको शोधू मंदिरात
अरे मी आहे तुझ्यात

ना घरात, ना दारात
मी आहे तुझ्या मनात
नको शोधू दगडात
मी आहे तुझ्या विश्वासात

ना जातीत, ना धर्मात
मी आहे सत्कर्मात
नको शोधू पोथीपुराणात
मी आहे तुझ्या प्रार्थनेत

ना याच्यात, ना त्याच्यात
वाहणाऱ्या संथ पाण्यात
नको शोधु कशाकशात
मी आहे साऱ्या जगात

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11