शोध स्वतःचा

Started by कदम, February 10, 2017, 07:07:07 PM

Previous topic - Next topic

कदम

काय,कसा,कुठे,कोण आहे मी ?
कासावली काया कशासाठी,
असा का आहे मी ?

वाट कोणाची पाहातो ?
गाव असा का ? कोसतो
पाञ "ते"कोणते ?
अदभुत जगी..रूप "ते" कोणते ?
काय हे ? शोधंत आहे मी

आरश्यात पाहतोय कोणाला?
ऐंकूण जनाचे,करून मनाचे,
उणीव कशाची ? काय कमी मला?
रूजलं तर नाही बियाणं ईपरीत मनाला
"मलाच" मी शोधंत असतो

ठाव ठिकाणा लागत नाही
घट्ट मन माझे,का नाही ?
वट्ट माझा पण,का नाही ?
हट्ट कोणी पुरवत,का नाही ?
सोडलं मला एकलं तर नाही ?
"मलाच" मी शोधंत असतो

अघोरी झाले,कर्म तर नाही ?
निकृष्ट माझे ,वर्म तर नाही ?
केला एखादा ,जुर्म तर नाही
अनोळखी जीवनाचे मर्म तर नाही
"मलाच " मी शोधंत असतो