निराशा

Started by कदम, February 10, 2017, 07:22:27 PM

Previous topic - Next topic

कदम

प्रत्येक निराशा
घेऊन असते आशा
किरणांतून निराशेच्या
उमले प्रकाश बनूनी आशा

जगण्याची आशा
जगवण्याची आशा
आली जरी निराशा
ऊजळते जीवन घेवूनी आशा

जनीमनी सर्वांची आशा
धनी-ऋणी प्रत्येकाची आशा
एकवटते होऊन जनशक्ती
लखलखटण्या ती निराशा

निरगुणास आशा
दुर्गुणांस आशा
जीवीतास लाभलेली आशा
गुणवंत होऊन दरवळते निराशा