** नवी स्वप्न नवी अाशा **

Started by ATAMOLARMY9, February 10, 2017, 09:14:11 PM

Previous topic - Next topic

ATAMOLARMY9

जीवनाच्या वाटेवर चालतांना,
कितीतरी वळणे येतात........
पूढे अाल्यावर त्या वळणांतून,
तीही किती साधी वाटतात......
समोर अालेले कुठलेही संकट,
वेळेबरोबर अापच सुटून जातात.....
घाबरून गेलो या वळणांना,
तर माघे खेचणारे बरेच असतात......
म्हणून प्रश्न प्रश्न नसते करत राहायचे निव्वळ,
ते उलगडविण्यासाठी लागणारी कौशल्ये अात्मसात करायची असतात....
नव्या अाशा ठेवायच्या असतात,
अाणि नवी स्वप्ने बघायची असतात....
संधीना अोळखून,
सदा पुढे नि पुढे चालत रहायचं असतं,
अाणि अायुष्य हसत हसत जगायचं असतं......
~ अमोल घनश्याम तितरमारे