तूच आहेस तो..

Started by Vishakha Sonawane, February 11, 2017, 10:08:35 AM

Previous topic - Next topic

Vishakha Sonawane

तूच आहेस तो..


मनातल्या मनात रडणार हे फूल का जणू आजकाल फुलू लागलय,
कधीतरी भेटणार हे मन आता तुझ्याशी नव्याने भेटी घडवू लागलय.

आजकाल काय झालय या मनाला काहीच कळत नाही,
तू समोर येताच डोळे पानाऊ लागतात
आणि अश्रु लपवायला मात्र तुझाच आधार घेऊ लागतात.

कधीही न बोलणार मन आता तुझ्यासमोर सार गुपित खोलू लागलय
कधी कोरडया रुपात ..तर कधी चिंब हृदयाने मोकळ होउ लागलय.

पण आता 'तूच आहेस तो' हे सांगणार कसे तुला,
गुज हे मनातल कळणार कसे कुणाला..



                                      @ विशाखा सोनावणे .... @