व्हॅलेन्टाईनची गोष्ट

Started by पल्लवी कुंभार, February 11, 2017, 10:42:45 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

नाSSSही!!
ही गोष्ट नाही तर आहे न थांबणारी धडधड...
सुरु होतेच मुळी असीम आसमंतात,
पहाटेच्या तिच्या कोवळ्या उन्हात
जिथे रोरावतोय पश्चिमेचा वारा,
त्या क्षितिजावर...
त्याच्या नजरेत पेटले आहेत
उगवत्या सूर्याचे अग्निकुंड,
झेपावत आहेत स्वप्ने दूर सागरावर,
लाभते भरती सुखांची फक्त तिला,
हसऱ्या किनाऱ्यावर...
ती कळी कोवळी जणू जाई एकटी फुलांफुलांतून
अन तो निवडुंग जसा पहावा कुंपणाआडून
रुक्ष-निबड...
त्याने हुंकारले जा कवेत भरतीच्या सागरात
मिटली तिची पापणी येता लाट लाजेत
सागराने ओढले पाणी तिच्या बुजण्यात...
लोटता क्षण घे सूर क्षणात आली साद,
दिली तिने नजर खवळल्या लाटांना
पण भासली मासोळी जशी जाळ्यात...
फुत्कारून वारा आले वावटळ त्याच्या श्वासांत
झंकारता लाट तिने दवडली अशक्यापल्याड वाट..
नाही शिष्ठाई जाई, जुईची आता तिच्यात
फक्त ती फुलराणी गंधाळली त्याच्या प्रेमात.....

–पल्लवी कुंभार
Love is when he gives you a piece of your soul, that you never knew was missing.