तुला हे कळलंच नाही.........

Started by ATAMOLARMY9, February 11, 2017, 12:57:49 PM

Previous topic - Next topic

ATAMOLARMY9

काल मी तुला विचारलं, "काय अाहे सुरू?"
तू म्हटली, "थोड्या दिवसांत कळेल तुला"
मला हे कळलंच नाही.........
मनात शंका निर्माण झाल्या, मन घाबरू लागलं,
तुला काय माहीत झालं, परिस्थिति बिकट होऊ लागली,
मला हे कळलंच नाही.........
तु फक्त दिलखूशपणे हसली, पण कां?,
तूझ लग्न तर नाही जूळलं, म्हणून तु जरा लाजली,
मला हे कळलंच नाही.........
तु माझी गंमत घेत होती, दुसर्याच्या लग्नाची बातमी अशी दिली,
मला हे कळलंच नाही.........
तु जरा स्पष्ट बोलत जा, जीव घेशील माझा,
ह्रदयाचे ठोके बंद करत जा, मनात काय कालवा-कालव झाली माझ्या,
तुला हे कळलंच नाही.........
~अमोल घनश्याम तितरमारे