जग आपलं आपलं

Started by Anagha Bhosle, February 11, 2017, 05:07:20 PM

Previous topic - Next topic

Anagha Bhosle

या जगाचा पसारा फार विलक्षण आहे
प्रत्येकाचं इथं स्वतंत्र असं जग आहे

न कळतं वय संपतं तिथूनच जग आपलं घडत असतं
सगेसोयरे सवंगड्यांनी जग आपलं गजबजत असतं

जगाचा एक अलिखित नियमच आहे
आगमनातच 'गमन' लुप्त बसलेलं आहे
जग म्हणलं तर घडामोडी होणारच
येणारा जीव कधीतरी जाणारच

एखाद्याच्या जगाला अनंत सीमा असतात
अनेकांची विश्वे ज्यात समरसून जातात
एखादा आपलं जग असं तटबंदी करतो
त्याच्या गजाआड बंदिस्त तोचि असतो

आपलं जग घडवताना जगणं विसरून जायचं नसतं
भूतकाळाच्या अग्नीत वर्तमानाला जाळायचं नसतं
जग आहे सुंदरच फक्त जगता आलं पाहिजे
हसू अन आसू दोन्ही सहज जमलं पाहिजे

अनघा जावकर भोसले