किती तरी दिवसांनी

Started by nphargude, February 11, 2017, 10:03:14 PM

Previous topic - Next topic

nphargude

किती तरी दिवसांनी आज लिहायला बसलो..
सुचत नव्हते तरी अक्षरे कागदावर मांडत बसलो..
कुठे गायब होती माझी कविता मलाच कळले नव्हते..
धकाधकीच्या जीवनात शब्द माझे रुसून बसले होते..
हे काय होऊन बसले आयुष्याचे म्हणून विचार मांडीत बसलो..
किती तरी दिवसांनी आज लिहायला बसलो..

निवांत क्षणी खूप सुचायचे म्हणून कविता करत होतो..
शब्द रुपी मनातील भावना कागदावर मांडीत होतो..
कागदच तो पण होता आधार,
आता मात्र फक्त आयुष्याचे गणितच मांडीत बसलो..
कुठे हरवले ते क्षण याचा विचार करीत बसलो..
किती तरी दिवसांनी आज लिहायला बसलो..