का झालास या दुःखाचा वाटेकरी..

Started by Vishakha Sonawane, February 12, 2017, 11:48:49 AM

Previous topic - Next topic

Vishakha Sonawane

का झालास या दुःखाचा वाटेकरी..


इतकं अवघड असेल वाटल नव्हतं केव्हा,
जवळ वाटणारा आपला माणुस आपला होणारच नाही केव्हा.

का एवढा जवळचा झालास जेव्हा अपेक्षा नव्हती मला,
आज सार जीवन तुझ्यासोबत आहे तर एकट सोडून गेलास मला.

का एवढी स्वप्न दाखवलीस जेव्हा स्वप्न पहायची सवयच नव्हती मला,
का एवढी स्वप्न रंगवलीस जी पूर्ण करायचीच नव्हती तुला.

                                       
आज कितीही हसत राहिले तरी डोळ्यातील अश्रु दिसतील,
पण जर तू खुष असशील तर ते ही मला चालतील.

तू सुखी राहणार असशील तर ते दुःख ही चालेल,
कारण तुझ्या हसणाऱ्या चेहऱ्यावर माझी एक छोटीशी खळी असेल.


                                      विशाखा सोनावणे...

बुद्धभूषण गंगावणे

वा मस्त मनाची एकदम नाजुक नस पकडलीत तुम्ही या कवितेत....