शेवटची मिठी.....

Started by बुद्धभूषण गंगावणे, February 12, 2017, 12:54:52 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

मनाची ओढ तुझी मिठी,
शब्दांची जोड तुझी मिठी
डोळ्यातले अश्रु तुझी मिठी
ओठातले हसू तुझी मिठी
स्वर्गाच एकमेव दार तुझी मिठी
प्रेमाचं संचार तुझी मिठी
एक शरीर पण हात चार
दोन हृदयाला एका ठोक्याचा भार
श्वास गुंततो वारंवार
मनाला तुझ्या नजरेचे वार
भासे शरीर दोन पण सावली एक
तूच  तू मीच  मी तरी वाटे एक
कापसावर झालीस स्वार
ढग सुद्धा झेले तुझा भार
जणू झालीस फुलपाखरावर स्वार
दोन या शरीरांच एकच मन 
तुझे सौंदर्य माझे धन.
पण खूप आठवते
खूप रडवते
रात्र रात्र जागवते
एकटच लाजवते
तुझी ती शेवटची मिठी....


- बुद्धभूषण गंगावणे..
  7738628059.