प कविता

Started by shubham shahaji supane, February 12, 2017, 04:06:24 PM

Previous topic - Next topic

shubham shahaji supane


तुझी आठवण

आठवण तुझी होता क्षणी
स्थिर सदैव होतो मी,
काय जादू माझ्या मनी
पानाफुलातही तुला पाहतो मी.

होऊन भासांचे वेड पुन्हा
भुतकाळात पुरता रमतो मी,
तुझ्याशी बोलण्याचा आनंद आणि
हसण्याची मिश्किलता आठवतो मी.

एकटेच कधी हसतो तर
कधी स्तब्धही बसतो,
तासंन-तास भेटण्याचे ठिकाण नि वेळ,
यांची बेरीज करत राहतो.

दिवस पुर्ण तुझाच जातो
रंगण्यात तुझ्या उर्जा नवी,
मिटुन जाताच डोळे फक्त
स्वप्नातही तुच हवी.