स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ..

Started by Vishakha Sonawane, February 13, 2017, 11:15:10 PM

Previous topic - Next topic

Vishakha Sonawane

स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ..


ऐकणार असशील तर आज काही सांगायचय
देणार असशील तर आज काही मागायचंय.

राज्या स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ
शेवटच्या भेटीत तरी आयुष्यभराची साथ देऊन बघ
भावनांना सांभाळण्याच काम तुझ्या आठवणी करतील,
फक्त तुझा हात माझ्या हाती देऊन बघ
स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ !

खुप काही साठलय या मनात,
ते तरी एकदा ऐकून बघ
डोळ्यात साठलेले तुझ्या प्रेमाचे भाव
तुझ्याच डोळ्यांनी वाचून बघ
स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ !

वाटा आपल्या वेगळ्या होणारच आहेत
पण प्रयत्न म्हणून जोडण्याचा एक तरी मार्ग बघ
कळत नकळत जन्मलेल्या या नात्याला,
तुझ्या विश्वासाची साथ देऊन बघ
स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ !

ताटकळलेल्या या जीवाला झोपेसाठी
त्याच्या स्वप्नात एकदा येऊन बघ
कोलमडलेल्या या नात्याला
एकदा प्रेमाचा आधार तर देऊन बघ
स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ !

पुढे कधी भेटू ना भेटू
या घायाळ मनावर तुझ्या प्रेमाची फुंकर घालून बघ
विरहात सगळी स्वप्न मेली आता
त्यांना एकदा जागवून बघ
स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ !

गेले आता सर्व शरणावर
अश्रु तरी गाळून बघ
शमलेल्या या राखेवर
एकदा हात फिरवून बघ
स्वप्नात तरी एकदा माझा होऊन बघ !

                                                                विशाखा सोनावणे..