***** खूप दिवसांनंतरची तिची भेट *****

Started by Shri_Mech, February 14, 2017, 02:28:11 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** खूप दिवसांनंतरची तिची भेट *****


खूप दिवसांनी काल भेटली ती, स्वप्नात...

अवघडलेल्या मनःस्थितीत मला म्हणाली
अलीकडे खूप शांत असतोस तू ?
मी नजर खाली घालून म्हटलं,
उजाडलेलं रान आणखी कसं असणार ?


नजर चुकवत परत म्हणाली
हल्ली कुठली पुस्तकं वाचतोस ?
थोड्या शांततेनंतर मी उत्तरलो,
वाचणं बंद केलं, आता मन लागत नाही त्यात


परत माझं मन वळवण्यासाठी म्हणाली
तुझे आई-बाबा काय म्हणतायत ?
मी म्हणालो लग्नासाठी मागे लागलेत
पण मी तर दुसरीकडेच गुंतलेलो आहे


मग जराशी हळवी होऊन म्हणाली
सावर स्वतःला, विसरून जा तो 'आपला' भूतकाळ,
यावर 'क्रांतिवीर'च्या नाना पाटेकरसारखा
कितीतरी वेळ मी एकटाच हसत राहिलो,

तिच्यासमोर आणि ती गेल्यानंतरही....


Shri_Mech
Shri_Mech